Wednesday, 8 June 2011

थोडी ख़ुशी थोडा गम

कालच्या सारखी आजपण मैत्रिणीच कारण देवून बोलणार नाही अस मला वाटत होत. फक्त कॉल करायचा म्हणून मी आपला तिला नेहमीच्या वेळेला कॉल केला. ९ व्या कॉल तिने रिसीव्ह केला. आता फक्त औपचारितेसाठी बोलेल अस वाटत होत पण या वेळेला माझा अंदाज तिने खोटा ठरविला. ती जवळ जवळ २० मिनिट माझ्याशी बोलली. माझ्यासाठी तिने खास वेळ काढला होता. हा वेळ तिच्या ऑफिस टाइम होता तरी सुद्धा ती  बोलली. परत आजसुद्धा आठवण करून दिली की यापुढे आपल बोलण फक्त सर्वसाधारण असेल. पण मनसोक्त बोलत होती. तिच्या बोलण्यावरून अजूनही तिच पूर्वी सारख प्रेम आहे हे जाणवत होत पण ती ते दाखवून देत नव्हती. बराच दिवसाणी तिच्या असा बोलणानी मला बर वाटल होत  संध्याकाळी तुला कॉल करते अस स्व:ताहून सांगीतल. कॉल करणार नाही याची मला खात्री होती पण कदाचित करेल या आशेवर मी होतो. तिचा कॉल घरी असताना आला तर बोलायला जमणार नाही म्हणून मी उशिरा आलो स्टेशनला तर ही बसच्या लाइन मध्ये उभी होती, मी म्हंटल आपण बरोबर जाऊ तर ती म्हणाली तू जा मी मागुन येइन. मला बघितल्यावर तिच्या चेहरा पडला होता म्हणून मी तिच ऐकल. सकाळी बोलल्यावर जो आनंद झाला होता तो संध्याकालच्या वागणानी पूर्ण विरघलूनच गेला. उदया सकाळी बोलणार नाही हे आताच मला कळल होत.  

Tuesday, 7 June 2011

काहीही बोल पण बोल

घरी असताना संदेश पाठवू नकोस अस सांगितल्यामुले आज सकाळी संदेश पाठविला नाही. कामावर लवकर गेली, म्हणजे आमच सकाळी बोलण होणार नाही हे मी समजून गेलो. तरीही नेहमीच्या वेळेला मी कॉल केला तिच्या लगेच संदेश आला, " मैत्रिण बरोबर आहे " मी म्हंटल ती नसताना १ मिनिट तरी बोल अस उत्तर दिल. ४ कॉल केलेच पण काही उपयोग झाला नाही. थोड्या वेळाने संदेश पाठविला त्यात म्हणालो, " का नाही रागवलिस माझ्यावर ? रागव, काहीही बोल, बडबड मला, पण अशी गप नको राहूस. पूर्वी बोलायचिस तसीच बोल, घरी असताना सुद्धा संदेशद्वारे बोल. अस केलस तरच मी समजेन तू मला मनापासून माफ केलस म्हणून, तुझ्या प्रतिसादची वाट बघतोय." सकाळपासून संदेश पाठविले. अखेर संध्याकाळी तिने उत्तर दिल. पण माफ केलय अस नमूद केल नव्हत. खर तर तिने मला अपेक्षित असलेल उत्तर दिलच नाही. मी पण आग्रह धरला नाही. आज संध्याकाळी लवकर घरी आली होती. बोलताना जरी ती मला माफ करीत असली तरी घरी गेल्यावर वागताना तिची नाराजी लगेचच जानूण येते. कदाचित उदया सुद्धा मला अशीच तिचा आवाज ऐकू देणार नाही वाटत.    

Monday, 6 June 2011

शुभ प्रभात



शनिवारी सकाळी " शुभ प्रभात " असा कालच्या सारखा संदेश पाठविला पण आज तिने प्रतिसाद दिला नाही. तिच्या अशा वागण्यानी, तिच्या मनात काय चालय हेच कळूच देत नाही. मला वाटल आज आमच बोलण होणार नाही. आता परत मी पहिल्या सारखा कॉल करत राहतो जेणेकरून तिचे दोन शब्द तरी ऐकायला मिळतील. तिला माहिती आहे की मला तिचा गोड आवाज खूप आवडतो ते. म्हणून तर थोडा वेळ वाट बघायला लावून नंतर बोलणार. ८ व्या कॉलला बोलली, तिची मैत्रिण होती बरोबर म्हणून अगोदर नाही बोलली. आपेक्षा नसताना बोलली खूप बर वाटल. आज सुद्धा ४ संदेश पाठविले. नेहमीसारखी रात्री संदेशद्वारे बोलावी म्हणुन संदेश पाठविला पण तिने प्रतिसाद दिला नाही. रात्री ती तिच्या बाबाना खूप ओरडत होती, मला वाटत होत की माझा राग त्यांच्यावर का काढते. त्या विचारानी रात्रभर झोपलो नाही. रविवारी सकाळी तिला संदेश पाठविला त्यात म्हणालो, " तुला रागात मेल पाठवून माझाकडून मोठी चुक झाली आहे, तू खुपच दुखावली आहेस, यापुढे नाही होणार अशी चुक, मनापासून माफ कर आणि पूर्वीसारखी वाग माझ्याशी, हे मला संदेशने कळव, मी वाट बघतोय." ३ संदेश पाठविल्यावर तिने प्रतिसाद दिला, " अरे मी तुझ्यावर रागवले नाही, तू संदेश पाठवू नकोस" यावरून ती नाराज आहे हेच स्पस्ट होते. मला पाहण्यासाठी आज ती माझ्या घरी आलीच नाही. संध्याकाळी मैत्रिणी बरोबर फिरायला गेली होती पण मी आपला तिच्या विचारातच होतो. हिला त्याच  काहीही वाटत नव्हत.   

Saturday, 4 June 2011

दुरावा वाढतोय

       
तिला वाटल की हा आजपण माझ्याबरोबर स्टेशनला येइल म्हणून लवकर निघाली. मी नेहमीप्रमाणेच कामावर निघालो. सकाळी " शुभ प्रभात "  असा संदेश पाठविला. तिने सुद्धा लगेचच प्रतिसाद दिला. कॉल केल्यावर बोलली माझ्याशी बराच वेळ. बोलण्यातून दुरावा जाणवत होता. तुझी आठवण आली तर संदेश पाठवू का ? ती म्हणाली, " चालेल मला तू पाठव." प्रेमाच बोलण्यापेक्षा सर्वसाधारण गोष्टीवर बोलण्याचा तिचा जास्त कल होता. आमचे बिघडलेले संबंध परत पूर्ववत होतील अशी काही चिन्ह दिसत नव्हती. भेटण्यापेक्षा मला ती पूर्वी सारखी माझ्याशी बोलावी असच वाटत होत. ती खुपच हट्टी तसेच जिद्दी आहे त्यामुले ती नाही माझ ऐकणार. प्रत्यक्ष बोलण्यापेक्षा आमच संदेशद्वारे बरच बोलण होयच, त्याला वेळेच बंधन नसायच. त्याला आता मी पूर्णपणे मुकणार. संध्याकाळी ती कामावरून घरी आल्यावर मी खास तिला बघण्यासाठी तिच्या घरी गेलो. घरातच होती. मला बघितल्या नंतर सुद्धा तिच्या चेहरावर हसू होत, ते बघून मला खुप बर वाटल. सकाळी बोलताना सागितल होत की हसरा चेहरा ठेव. माझ ऐकल तिने. यावरून ती माझ्यावर मनापासून प्रेम करते हेच सिद्ध होत. सकाळपासून दिवसभरात ५ संदेश पाठवले. खुप दिवसानी तिला मी असे संदेश पाठवले. आता रोजच पाठवेण. 

Friday, 3 June 2011

गोड हसून बोलणार ना

            
काल रात्रीच तिला सागुन ठेवल होत, उदया आपण दोघे एकत्र रेल्वे स्टेशन पर्यंत जाऊ. देलेल्या वेळेला ती बस स्टॉपला आली. मला अपेक्षा होती ती माझ्याबरोबर ऐइल म्हणून. तिच्या चेहरावर वेगलाच तणाव होता. उदास चेहरा पाहून मला माझ्या अपराधाची जाणीव झाली. तिच्या मते तो अपराध होता, पण जे खर आहे तेच तिला वेगळ्या बाजूनी दाखवून मी दिल होत. सत्य हे पचवन फार कठीण असत पत्येकला जमत नाही ते.त्यामुलेच ते तिच्या मनाला  चांगलाच लागल. बसमध्ये सीट वर बसताना ती माझ्या बाजूला न बसता वेगळी बसली, यावरून राणीसाहेबाचा मुड़ मला लगेच कळला, त्यामुले बसमध्ये आमच बोलण झालच नाही. बस मधून उतरल्यावर स्टेशनला जाई पर्यंत बोललो. रेल्वेच्या डब्ब्यात चढल्यावर कॉल कर त्याप्रमाणे मी कॉल केला, १५ - २० मिनिट ती माझ्याबरोबर बोलली. रात्री ११ नंतर मला संदेश पाठवू नकोस, यापुढे आपण भेटणार नाही फक्त फ़ोन वरून बोलायाच. तुला मी विसरण्याचा प्रयत्न करते मला मदत कर. अस ऐकून मी गार झालो. ती हे सर्व शांतपणे सांगत होती, मी तुझ्यावर नाराज आहे हे तिच्या बोलणातून मला कलू नहे याचा ती प्रयत्न करीत होती. दिवसभर मी तिचाच विचार करत होतो. कामावरून घरी आल्यावर संदेशद्वारे माझाशी बोलेल अशी मला आशा होती, ती संदेश पाठवित होती पण मला नाही इतराना.  घरात  हल्ली ती खुपच शांत असते असे तिचे घरचेच म्हणतात. याला अप्रत्यक्ष मी सुद्धा जबाबदार आहे हे तिला आणि मलाच माहिती.    

Thursday, 2 June 2011

माझ्याकडून दुखावली गेली

         
मी पाठविलेला मेल वाचून ती खुपच नाराज झाली आहे. त्यामुले आता ती माझ्या  पासून दूर जाण्याचा प्रयत्न करीत आहे. अस सांगुन मला तिला माझ्यापासून दूर करायच नव्हत. मला फक्त माझ मन तिच्याजवळ मोकळ करायच होत. ती मला वेळ देत नव्हती म्हणून रागाच्या भरात मी काही बोलू  शकत नव्हतो आणि तो राग मी मेल पाठवून व्यक्त केला. पण त्याचा असा परिणाम होइल याची मला कल्पनाच नव्हती. तिला कस मनवु हेच मला कळत नव्हत. तिला माझ्यासाठी राजी करायच आहे. काल तिच्याशी बोलाव अस वाटल म्हणून ऑफिसमध्ये फ़ोन केला, म्हणाली साहेबानी बोलावल, खुपच तणावात आहे, संध्याकाळी कॉल करुन बोलेन. तिच्या बोलणावरुनच मला कळत होत. दिवसभरात सारखी तिची आठवण येत होती. सर्व बाजूनी तिला त्रास असताना मी तिला समजुन घेण्या ऐवजी हा मेल पाठवून तिला चांगलाच दुखावल. संध्याकाळी  तिला बोलणासाठी संदेश पाठविला. पाठविलेला संदेश पोहचला की नाही हे पाहण्यासाठी कॉल केला तिने कॉल रिसीव्ह केला अंदाजे ३ मिनिट बोलली. थोडया वेळाने कॉल करते. परत मीच संदेश पाठवून नको करूस अस सांगीतल. तिचा बोलण्यावरून ती दुखावले याची मला जाणीव झाली. माझ्याकडून दुखावली गेली आहे हे मी सहन नाही करू शकत. ही चुक मला लवकरच दुरुस्त करावी लागणार. त्यासाठी  रात्री २ संदेश पाठविले त्याला काहीच प्रतिसाद दिला नाही.    
      

Tuesday, 31 May 2011

बोलणार कशी

शनिवारी मी नेहमीचा वेळेला तिला कॉल केला नाही, त्या वेळेला का कॉल केला नाही असा जाब विचारणार संदेश येणार नाही याची मला खात्री होती. यापुढे सकाळी तिला कॉल करायचा नाही अस मी ठरवल. या आठवडयात तिने मला कसा वेळ दिला नाही याचा ईमेल तिला पाठवणार होतो, ती म्हणाली, इन्टरनेट बंद आहे, नको पठावुस. त्या दिवशी नाही पाठवला. संध्याकाळी संदेशद्वारे थोडा वेळ बोललो. मला वाटल की, उदया ही भेटण्याचा योजना आखाते. पण अखेर निराशाच. रात्री सुद्धा बोलली नाही. रविवारी मी जरा तिच्यापासून दूरदूर राहण्याचा प्रयत्न केला म्हणजे दिवसभरात तिला माझा चेहरा दाखविला नाही, कॉल केला नाही, संदेशद्वारे सुद्धा बोललो नाही. यापुढे मी तिच्याशी  जवळीक करण्याचा प्रयत्न करणार नाही, कारण ती स्व:ताहून मला कॉल/ संदेश करणार नाही. सोमवारी त्या प्रमाने मी वागलो. रात्री ती बहिणीकड़े झोपण्यासाठी गेली होती. मला अपेक्षा होती की रात्री कॉल करेल पण नाहीच केला तिने. यापुढे आमजे बिघडलेले सबंध कसे पूवर्वत होतील याचीच मला चिंता लागली आहे. त्यात मी पाठविलेला मेल वाचून तिला माझा अजूनच राग आला असणार. काय प्रतिसाद देते ते काही तिच्या कालच्या वागण्यावरून मला कळल नाही. लवकर समजल तर बर होइल. वाट पाहण्याशिवाय मी काहीच करू शकत नाही. 

Friday, 27 May 2011

का विचार करू मी

  
तिला खरोखरच माझ्यासाठी वेळ देता येत नव्हता की जानूनबुजून अशा पध्दतीने वागून मला त्रास देयाचा होता हे अजूनही मला कळत नव्हत. हे जानून घेण्यासाठी मला काय केले पाहिजे याचा विचार करू लागलो. सकाळी माझ हक्काच वेळ हिच्या मित्रानी माझ्यापासून हिरावून घेतला. दिवसभरात तिचाशी बोलण्यासाठी ती मला वेळ कसा देइल का देणारच नाही. आज सुद्धा ७ - ८ वेळा कॉल केला पण ती प्रत्येक वेळी कॉल कट करीत होती. का कॉल कट करीत असेल? यावर मी आता विचार करायचा सोडून दिला आहे. दिवसात तिने एकही कॉल/ संदेश मला केला नाही. आज सुद्धा ती घरी उशिरा आली म्हणजे मित्राबरोबर मठात गेली असणार. संध्याकाळी कामावरून घरी आल्यावर संदेशद्वारे बोलायचो ते पण बोलण सध्या बंद आहे. बुधवारपासून ती कसलातरी विचारत आहे हे तिच्या चेहरावरून वाटत होत. तिचा तो उदास चेहरा मला पावहत नव्हता. कसला तणाव असेल तिला. का सांगत नाही मला. याच उत्तर सध्या तरी माझ्याजवळ नव्हत. तो शोधण्याचा मी केविलवाणा प्रयत्न करत होतो पण याच खर उत्तर ती सांगेल तेव्हाच मला कळणार होत. वाट बघण्याशिवाय मला दूसरा पर्यायच नव्हता. 

Thursday, 26 May 2011

कॉल करू नकोस

ती काल म्हणाली होती, उदया सकाळी तुझ्याबरोबर बोलण्यासाठी मी प्रयत्न करीन. याच अर्थ असा होतो की  बोलण्यासाठी मी हिच्यावर दबाव आणतोय. ती माझा बरोबर मुक्तपणे बोलावी अस मला वाटायच. नाइलजाने बोलण्यापेक्षा न बोललेली बरी. या पध्दतीने बोलणात काही अर्थ नव्हता. सकाळी ५ वेळा कॉल केल्यावर तिने प्रतिसाद दिला, मोजून फक्त २ मिनिट बोलली. नंतर तिचा मोबाइल बंद झाला तो ऑफिसमध्ये गेल्यावरच चालू झाला. याचा अर्थ मला समजला. तरीही मी तिला ऑफिसमध्ये मोबाइल वर कॉल केला पण फायदा झाला नाही. संध्याकाळी मोबाइल वर कॉल केला तर तिच्या मैत्रिणीनी रिसीव्ह केला व म्हणाली बाहेर गेली आहे नंतर कॉल करेल. माझ्या लक्ष्यात आल की हिनेच जानूनबुजून मैत्रिणीकड़े मोबाइल दिला असणार व सांगितले असेल की बाहेर गेली म्हणून सांगा. ही बाहेर गेली तर मोबाइल ऑफिसमध्ये कशाला ठेवेल. यावरून तिला हेच सांगायचे होते की. यापुढे ऑफिसमध्ये तू मोबाइल वर सुद्धा कॉल करायचा नाही. कामावरून येताना तिने कॉल केला नाही. या पुढे आमच पाहिल्यासारख बोलण होणार नाही याची कल्पना मला येत होती

Wednesday, 25 May 2011

तिला पाहवतच रहाव

   
आई सकाळी देवळात जाताना ती आईला भेटली. आई म्हणत होती, या पोशाखत ती खुपच सुंदर दिसते. मला प्रश्न पडला की ती ऑफिसला आज लवकर का गेली, काय कारण असेल. याच विचारत मी होतो. माझ्या मते, एकतर ती मुलाखातिसाठी किवा ग्रुप बरोबर सहलीला गेली असेल. नेहमीप्रमाने मी तिला सकाळी कॉल केला. तिचा काही प्रतिसाद आला नाही. अंदाजे १० वेळा तरी तिला कॉल केला असेन तेव्हा तिने संदेश पाठविला, मी मुलाखातिसाठी बाहेर आहे. लगेच तिला शुभेच्छा देणार संदेश पाठविला व म्हंटल तुला वेळ मिळेल तेव्हा कॉल कर. मुलाखतीच्या ठीकणापासून तिच्या ऑफिसमध्ये पोहचण्यासाठी अंदाजे १ तास वेळ लागतो. या वेळेत ती मला कॉल करू शकली असती पण तिने कॉल केला नाही. मी आपला दर १ - २ तासनी तिला कॉल करत होतो. ती काही प्रतिसाद देत नव्हती. तरीही कॉल करत होतो. अखेर कामावरून घरी येताना तिने मला कॉल केला आणि विचारते सकाळपासून कॉल का करत होता. वरून मला सांगते मित्र आहे बरोबर आपण उदया बोलू. मी म्हंटल ठीक आहे. तिला पहाण्यासाठी रस्तात तिची वाट पाहत होतो अखेर ती दिसली, आज नेहमीपेक्षा खुपच सुंदर दिसत होती. अस वाटत होत की तिला पाहवतच रहाव.   रात्री बोलण्यासाठी ३ संदेश पाठविले पण तिने काही प्रतिसाद दिलाच नाही.        

Tuesday, 24 May 2011

सुखद धक्का

        शुक्रवारी तिला सकाळी कॉल केलाच नाही कारण ती  त्याच्या सोबत असणार, माझ्या कॉलमुले त्याना उगाच त्रास नको. अत्ता हिला सुद्धा बोलायला आवडत नाही. ती पुर्विसारखी कॉल/संदेश करीत नाही. मी केला तरच प्रतिसाद देणार. दिवसभरात कॉल केलाच नाही. कालच्या सारखी रात्री बोलेल अशी अपेक्षा होती पण बोललीच नाही. शनिवारी रात्री बोलावी म्हणून सकाळपासूनच तिला कॉल करत होतो. तिचा एकही प्रतिसाद आला नाही. आज बोलण होणार नाही असच वाटत होत. रात्री संदेश पाठविले त्याला प्रतिसाद काहीच नाही. शेवटी ठरवल १० - १० मिनिटानी तिला कॉल करायचा. अखेर ७ व्या कॉल तिने प्रतिसाद दिला व दीड तास माझ्याशी बोलली. तिच बोलण खुपच मला सुखद वाटल, माझ्यावर मनापासून करीत असलेले प्रेम तिच्या बोलण्यातून व्यक्त होत होते. हे ऐकून मी तिच्यावर खुश झालो. हा माझा आनंद जास्त वेळ तिने टिकू दिला नाही. रविवारी आणि सोमवारी सुद्धा आमच बोलण झाल नाही. परत ती तशीच वागायला लागली. अत्ता तिची आठवण मला जास्तच बैचेन करू लागली आहे.   

Friday, 20 May 2011

खोट किती बोलणार

   
सकाळी नेहमीप्रमाने मी तिला कॉल केला तिने सुद्धा नेहमीप्रमाने  त्याला प्रतिसाद दिला नाही. दिवसभरात स्व:ताहून ती मला कॉल करेल अस होणार नव्हत. संध्याकाळी कामावरून घरी येताना कदाचित कॉल करेल या आशेवर मी होतो. पण निराशाच झाली. आज ती कामावरून उशिरा आली. तिला का उशीर झाला असा संदेशसुद्धा पाठविला होता तिने त्याला प्रतिसाद दिला नाही. रात्री १ तास आमच बोलण झाल. तेव्हा मला कळल, घरी येताना ती तिच्या मित्राबरोबर मठात गेली होती. यांचा बरोबर आज त्यांची मैत्रिण होती. मित्राबद्दल तिने जे सांगितले ते न पटणारे होते. म्हणे मित्र त्याच्या मित्राकडे अभ्यासासाठी येतो पूर्ण रात्र अभ्यास करतो आणि सकाळी कामाला जातो. घरी जातो की नाही हे तिलाच माहित. खोट बोलण्याला सुद्धा एक सीमा असते. सरळ सांगितल असत, मलाच घरी सोडायला येतो. खोट कशाला बोलायाच. रोज तरी किती खोट बोलणार. यामुले माझ सकाळच तिच्याबरोबरच बोलण बंद झाल. अजुन दोन रात्री बोलेल मग ते पण बंद. माझ्याबरोबर बोलायला तिच्याकडे वेळ नाही. असा परिस्थितीत मी कस तिच्याबरोबर वागाव हे कळत नव्हत. रात्रभर याच गोष्टीचा विचार करत होतो.

Thursday, 19 May 2011

मला का फसवतेस

    रात्रीच्या झालेल्या संभाशणाच्या आठवणीत कधी सकाळ झाली ते मला कळच नव्हत. थोडया वेळाने तिच्याबरोबर प्रत्यक्ष बोलणार याचा वेगळाच आनंद मला झाला होता. त्या क्षणाची मी वाट बघत होतो. मी तिला मोबाइल वर कॉल केला तिने सांगितले मैत्रीण आहे थोडया वेळाने कॉल कर.   थोडया वेळाने कॉल केल्यावर तिचा प्रतिसाद काहीच आला नाही. कॉल का घेत नव्हती, हेच कळत नव्हत. आज तिने अस नको करायला पाहिजे होत. तिला अत्ता ऑफिसमध्ये फ़ोन केलेला आवडत नाही. संध्याकाळी कॉल करणार नव्हती याची खात्री होती. ती कामावरून घरी आल्यावर आमच संदेशद्वारे बोलण झाल नाही पण रात्री ती माझ्याशी प्रत्यक्ष बोलली कारण झोपण्यासाठी मैत्रीणीकड़े गेली होती. तिला विचारल कॉल का केला नाहीस तर म्हणते कामातला मित्र  होता बरोबर कस बोलणार.  कामावरून येताना हिला घरी सोडतो आणि नंतर त्याच्या घरी जातो. सकाळी ही सुद्धा त्याच्याबरोबर  पुरुष प्रवाशांच्या डब्ब्यातून जाते. हे एकून मी गारच झालो.  गर्दीतून कोणत्या अवस्तेत जात असतील याची कल्पना न केलेली बरी. हे सर्व ती मला सहजतेने सांगत होती. मला खात्री होत होती की माझ्या बरोबर प्रेमाच नाटक करते याची. जवळ जवळ आम्ही १ तास बोललो. पण नंतर माझ तिच्या बोलण्याकड़े लक्ष्य नव्हत. अशा प्रकारे ती माझ्या विश्वासघात करते याची मला चांगलीच जाणीव होऊ लागली. 

Wednesday, 18 May 2011

अखेर तिला बोलत केल

  
रात्रीची पुरेशी झोप झाल्यामुले सकाळी उठल्यावर मन हलक हलक वाटत होत. त्यात आज सार्वजनिक सुट्टी असल्याने ऑफिस बंद होत. आजच्या दिवसात काय काय काम करणार याच्या आराखडा कालच तयार केला होता. बाकीची सर्व कामे राहिली तरी ते एक काम कसही फत्ते करायच होत. मोबाइलच्या  कॉलला प्रतिसाद देणार नाही म्हणुन ११ वाजता ऑफिसमध्ये फ़ोन केला. ती म्हणाली,"मोबाइल वर कॉल कर." मोबाइल वर कॉल केल्यावर म्हणते दुपारी १ वाजता कॉल कर. जर तुला दुपारी १ वाजता कॉल करायला सांगायच होत तर फ़ोन वरच सांगायच. मग मोबाइल वर कॉल करायला का सांगितलस. यावरून कळत की, ती मला मानसिक त्रास देण्याची एकही संधि सोडत नाही. दुपारी कॉल केल्यावर सुद्धा असाच त्रास देणार याची मला चांगलीच कल्पना होती. झालही तसच. १ वाजल्यापासून कॉल करत होतो. अखेर ०१३० वाजता कॉलला प्रतिसाद दिला. दुपारी ०२३० वाजता करेन अस म्हणाली. तिचा राग शांत करायचा होता म्हणून सारखा कॉल करत होतो. अखेर ५ वाजता आमच बोलण झाल. ती कामात असल्याने आमच बोलण पाहिजे तस झाल नाही पण ताणलेले संबध पूर्ववत होतील इतक तर नक्की झाल. कामावरून घरी येताना हिने नेहमीप्रमाने कॉल काही केला नाही. संदेशद्वारे संध्याकाळी व रात्री आमच बोलण झाल. दिवसभरातील तिच्या बोलण्यावरुण माझ्या एक गोष्ट लक्ष्यात येत होती की, मे महिन्यापासून ही माझ्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करीत होती व ती तिच्या कामातल्या मित्राबरोबर जवलिक करीत आहे. ही गोष्ट अत्तापासून सुरु झाली की पहिल्यापासून आहे पण मला कलुन देत नव्हती हे पाहणे मला गरजेचे आहे.  माझ्याबरोबर खरच प्रेम करते की घरी आल्यावर टाइमपास हवाय म्हणून माझ्याशी प्रेमाच नाटक करते हे थोड्या दिवसात कलेल मला. जास्त वेळ घेणार नाही यासाठी. लवकरच निकाल लावतो.        

Tuesday, 17 May 2011

हिचा राग जाणार कसा


कामावर जाताना मला ही नक्की कॉल करेल अस वाटत होत पण आजसुद्धा निराशाच. ही स्व:ताहून का कॉल करीत नाही. अजून हिचा राग कसा शांत होत नाही. खर कारण कळत नव्हत. ही तर म्हणायची, मी कितीही तुच्यावर रागवले तरी ०२-०३ दिवसात माझ्या राग अपोआप शांत होतो तू त्याची कालजी करू नकोस. आज ०८ दिवस झाले तरी हिचा राग का शांत होत नाही. काय कराव. हिला कस विचाराव. हा माझ्यापुढे एक पेचच होता. घरचे ०४-०५ दिवसानी येणार होते. कदाचित हिला वाटत असेल, हा एकटाच आहे तर होटलला जेवण्यासाठी आग्रह धरेल म्हणून ही जानूणबुजूण तर मला टालत नसेलगेल्या वेळी असच झाल, आमचा बेत ठरला होटलमध्ये जेवण्याचा, नेहमीप्रमाने आयत्या वेळी ही म्हणते मला नाही जमणार. संधि चांगली होती. पण हिने मुद्दाम बेत फसवाला. तू ला जर येयाच नव्हत तर अगोदर सांगायच पण तस केल असत तर मला मानसिक त्रास कसा झाला असता. मग हिला बर वाटत. त्या दिवसानंतर मी लगेच मी गावी गेलो आणि आल्यावर हे भोगतोय. कामात अजूनही लक्ष्य लागत नव्हत. तिच्याबरोबर बोलण्यासाठी ऑफिसमध्ये फ़ोन केलाच नाही. संध्याकाळी सुद्धा मी तिला फ़ोन केला नाही की तिने सुद्धा मला कॉल केला नाही. तिला किंवा मला दोघंपैकी ऐकाला पुढाकार घेवुन ताणलेले संबध सैल करावे लागणार होते. ती पुढाकार घेइल अस मला वाटत नव्हत म्हणून मीच ठरवल,. उदया काहीही करून समझोता करायचा आणि दोघामधिल शीतयुध संपवायच.

Monday, 16 May 2011

चेहरा तरी पाहू दे

    ती ऑफिसला जाताना मला कॉल करीत नाही, तर आज सुट्टीच्या दिवशी खास मला कॉल करण्यासाठी घराच्या बाहेर जाइल व मला कॉल करेल. असा विचार करने, म्हणजे वेडया माणसाला एखादी गोष्ट समजून सांगने. ती कॉल करणार नाही याची मला २०२% खात्री होती. सुट्टी असल्याने घरातील कामे सावकाश करीत होतो. सकाळी नाश्ता करावासा वाटतच नव्हता कारण तिने स्व:ता  बनविलेला नाश्ता करण्याचा खूपच मोह मला झाला होता. काय करू पण शकत नव्हतो मी. ती स्वयपाक  उत्तम बनवत असून तिच्या हाताला चव सुद्धा चांगली आहे. हे तिच गुपित अजूनपर्यंत तिला मी सांगीतल नव्हत, ही गोष्ट माझ्या तोंडून ऐकण्यासाठी तिने बराच प्रयत्न केला पण विषय बदलून मी तिला सांगितले नाही.तिने बनविलेला पदार्थ खाण्याचा योग २ वर्षा पूर्वी आला होता. तेव्हा तिची मोठी बहिन गरोदर होती.बहिन आपली रोज ऐक ऐक नविन पदार्थ बनवायला सांगायची, ही पण तिच्यासाठी मन लावून पदार्थ बनवायची.  एके दिवशी हिने रगडा पेटिस बनवून माझ्या घरी दिला होता, माझ्या नशिबात फक्त १ तुकडा आला, त्याची चव अजूनही मी विसरलो नाही. मी स्व: ताहुन हिला कधीच फरमाइश केली नाही आणि करणार सुद्धा नाही. २ वर्षानंतर आज तो योग येत होता पण हिने प्रयत्नच केला नाही. खास माझ्यासाठी बनवत नाही तर बहिनीसाठी बनवते अस सांगून माझ्याकरीता बनवायच. त्यात आज कुणीही वाटेकरू नव्हता. माझ मन चांगलाच तृप्त झाल असत. पूर्वीसारखी हिला माझी कळकळ राहिली नाही, नाहीतर काहीना काही 
बनवून मला नाश्ताला जरुर दिल असत. पण सध्या मला दु:खी कस ठेवता येइल हेच ती बघत असते. फेरफटका मारण्याच्या निमिताने तिच दर्शन घेवुन याव अस वाटत होत. पण नाही गेलो. गावावरून आल्यापासून ती चेहरा दाखवायला सुद्धा टाळते. हिला त्रास होइल म्हणून लवकरच काकां कड़े जेवायला गेलो तिथे बराच वेळ थांबलो आणि ०३३० वाजता घरी आलो. ही सुद्धा घरच्यांन बरोबर बाहेर जावून आली होती. संध्याकाळी मानलेल्या बहिणीला घेवुन बाहेर फिरून आली. आल्यानंतर परत तिच्या मामाच्या वाढदिवसाच्या पार्टीला गेली ती रात्रीच आली. मी पण आपला संध्याकाळी एकटाच फिरत होतो तिच्या आठवणीना बरोबर घेउन. आमचे ताणलेले संबध परत कसे हलकेफुलके होणार यांचाच विचार करीत होतो. आज सुद्धा आमच काहीच बोलण झाल नाही. दिवस फुकट गेल्यासारखा मला वाटत होता. दिवसभरात तिच्या चेहरा पाहता आला नाही, तिच्या चेहरावर माझ्यासाठी असणारे भाव मला पहायचे होते. पण आत्ता ते शक्य नाही. खुप उशीर झाला होता.    

Sunday, 15 May 2011

प्रेमाने वाग माझ्याशी

सकाळी झोपून उठल्यावर बर वाटत होत. पोटात दू:खाण्याचा त्रास कमी होता, पूर्ण बरा झाला नव्हता. ऑफिसला सुट्टी असल्याने घरीच आराम करणार होतो. घरचे गावी गेल्याने घरी एकटाच होता. ही स्व:ताहून मला कॉल करेल अशी आशा सोडून दिली होती. पण अशा या एकटेपणात तिची उणीव जरा जास्तच भासू लागली. वेळ जाता  जात नव्हता व त्यात पोटात दु:खाण्याचा त्रास वाढू लागला होता. डोक्यात नको नको ते विचार काहुर माजावत होते. तिच्यावर असलेल्या विश्वासावर अशा वागणाने तडे पडायला सुरुवात झाली होती. खरच तिच माझ्यावरच प्रेम कमी झाल असेल. असेल सुद्धा. नाहीतर गेल्या ८ दिवसात मी घरी एकटाच आहे हे माहित असून देखील मी रोज जेवतो कुढे? जेवतो की उपाशी राहतो? घरातील कामे याची साधी चोकशी सुद्धा ती करत नाही. तिला वाटत असेल मी जर याला विचारल आणि याने मलाच जेवण बनवायला सांगितल तर तसेच घरची कामे सुद्धा माझ्याकडून करून घेइल. तू हे न सांगताच करायला हव होत. मला अजूनही आठवत की हिच्या मित्रांचे आई बाबा गावी गेले आणि ते एकटे असतील तर ही त्यांच्या आवडीचे पदार्थ बनवून त्यांच्यासाठी घेउन जायाची. मी तिला याबद्दल कधीही काही बोललो नाही. खरच ही माझ्यावर मनापासून प्रेम करीत असती तर गेल्या ८ दिवसात रोज नाही पण निदान १ दिवस तरी माझ्या आवडीचे पदार्थ डब्ब्याला बनवून ऑफिसला जाण्यासाठी डब्बा दिला असता, आवडते पदार्थ नको पण चपाती-भाजी नक्कीच दिली असती. मला कोणते पदार्थ खायला आवडतात आणि कोणते नाही हे तिला चांगलच माहित आहे. मला खास तिला सांगायची गरज नव्हती. का तिने अस केल नसेल.? त्या ४ दिवसात तिच माझ्यावरच प्रेम कमी व्हाव. याला काही अर्थच नव्हता. पण तिच खरच माझ्यावर प्रेम आहे की नाही हे मला कळत नव्हत तिच्या अशा वागण्यामुले.
       रात्रि तिचा अनपेक्षित संदेश आला त्यात विचारत होती, जेवलास का? आणि माझ्यावरचा राग शांत झाला का.? याला मी काहीच उत्तर दिल नाही. थोड्या वेळ्याने तिचा दुसरा संदेश आला, त्यात ती म्हणाली, " माझ्या अशा   वागण्यानी तुला त्रास झाला, त्याबद्दल मला माफ कर, पण बोल माझ्याशी" पण मी तिला अगोदर पाठविलेला संदेशची आठवण करून देवून कळवळ की, अगोदर माझ्याशी कॉल करून बोल त्यानंतर मी तुला कॉल/ संदेश करेन." याला तिने काही उत्तर दिले नाही. उदया बघू कॉल करते का.?   

Saturday, 14 May 2011

खर कारण का नाही सांगत?


मी ४ दिवसासाठी गावी गेलो या कारणामुले  तिला राग येवून ती माझ्याशी बोलत नाही, हे काही मला पटत नव्हते. खर कारण ती माझ्यापासून लपवत आहे. ते तिने का लपवाव, काय कारण असेल. गावी जाण्याचा आदल्या दिवशी सुद्धा तिच्या असाच मुर्ख वागनाने रागावलो होतो. किती दिवस गावी जाणार हेच तिला सांगितले नव्हते. पण मी तिच्यावर रागवालो होतो, ती नव्हती. या ४ दिवसात अस काय झाल हे मला समजन्याचा मार्ग सापडतच नव्हता. काल रात्रीच्या संदेशानुसार, सकाळी मी तिला कॉल केला नाहीतिने कॉल करायल पाहिजे होता पण तिने कॉल केला नाही. आज तिच्या ऑफिसमध्ये सुद्धा फ़ोन केला नाही. दिवसभर तिचाच विचार करत होतो. या गोष्टीचा मला जरा जास्तच त्रास होत होता. ऑफिसमध्ये कामात चुका होण्यापेक्षा आपल घरी जाव. साहेबाना सांगितल तब्येत बरी नाही, घरी जातो. दुपारी २ वाजता ऑफिसमधून  घरी येण्यासाठी निघालो. काहीही सुचत नव्हत. योगायोगाने तिची आई भेटली रस्तात व म्हणाली," आज लवकर आलास कामावरून, मी म्हटल आज काम लवकर संपल म्हणून, खर कारण तुमची मुलगी आहे हे कस सांगणार ." मी आपला चातक पक्ष्याप्रमाने तिच्या कॉल ची वाट बघत होतो. पण दिवसभरात तिने कॉल केलाच नाही. संध्याकाळी तिची मानलेली बहिण दोन मुलंसह लांबून घरी राहायला आली. जी धूसर आशा होती ती पण संपलीरात्री एक तरी संदेश पाठविल अस वाटल होत पण नाहीच पाठवला तिने. संध्याकाळी खरोखरच अचानक माझ्या पोटात दुखू लागल. डॉक्टरकड़े जाणार नव्हतो पण त्रास जास्तच होत होता. अखेर १० वाजता डॉक्टरकड़े गेलो. या त्रासापेक्ष्या तिने दिलेल्या मानसिक त्रास जास्तच होता. अशा वेळी ती माझ्याबरोबर असावी अस मला सारख वाटत होत. पण याची साधी चोकशी  करावी अस सुद्धा तिला वाटत नव्हत. याचाच मला जास्त दुख वाटायला लागल.      

Friday, 13 May 2011

मी का बैचेन होतोय तिच्यासाठी


तिच्याबरोबर बोलण्यासाठी आज मी जास्तच बैचेन होतो. सकाळीच तिच्या मोबाइलवर कॉल केला. मोबाइलची घंटी वाजत होतीकॉल रीसिव्ह केला नाही. मला वाटलपर्स मध्ये मोबाइल असल्याने तिच्या लक्ष्यात येत नसेल१० - १०  मिनिटाच्या अंतराने मी तिला ४ कॉल केले. पण एकदा सुद्धा तिने माझ्या कॉल रीसिव्ह केला नाही. बोलायच तर होतच, मग काय ऑफिस मध्ये फ़ोन केला. राणी साहेब म्हणाल्या, " कामात व्यस्त आहे थोड्या वेळाने फ़ोन करते." मी यावर काहीच बोललो नाही. फ़ोन ठेवून दिला. आता तिच्या फोनची वाट बघण्यशिवाय मला गतंतर नव्हते. कामात लक्ष्य लागत नसल्याने मी तिला संदेश पाठवून सांगितले की मला आज जास्त काम नाही. तुला वेळ मिळेल तेव्हा मला कॉल करमी तुच्या कॉलची वाट बघत आहे. संध्याकाळी झाली तरी हिचा कॉल आला नाही म्हणून परत ऑफिस मध्ये फ़ोन केला. ती म्हणाली घरी जाताना तुला नक्की कॉल करेन कालच्या सारख होणार नाही. पण तिने आज सुद्धा कालच्या सारखच केल. ती घरी लवकर आली म्हणजे तिला ऑफिसमध्ये कामाचा लोड नव्हता. ती जाणूनबुजुन माझ्याशी बोलत नाही. हे माझ्या लक्ष्यात येत होत. तिच्या हा बदलेला अवतार पाहून तिच्याशी कस वागाव हेच कळत नव्हत. माझा तिच्यावरचा संयम सुटत होता. रात्रि तिला संदेश पाठविला, त्यात म्हटल " सोमवारी रात्रि तू मजेत होतीस, काल लगेच तणावमध्ये  आलीस, खर काय ते तुलाच माहिती? जोपर्यंत तू स्व:ताहुन मला कॉल करून प्रत्यक्ष्य बोलत नाहीस. तोपर्यंत मी तुला कॉल करणार नाही आणि तू दिलेल्या संदेशाला उत्तर सुद्धा देणार नाही, तुझ्या अश्या वागन्याच अर्थ काय होतो तो कलतोय मला." या संदेशाला काय उत्तर देते याची वाट बघत बसलो. रात्रि तिने उत्तर दिले ते असे " अरे वेडया, असा तणाव घेवु नकोस, गावी गेला होतास तेव्हा तुला आली का माझी आठवण." माझ्या लक्ष्यात आल की, मी गावी गेलो तेव्हा हीने एक सुद्धा कॉल केला नाही, जर केला असता तर तिच्या लक्ष्यात आल असत की माझा मोबाइल बंद होता ते. यावरून असच वाटत की, हिला ४ दिवसात माझी आठवण आलीच नाही. काय बोलायच हिला आता.?  आणि दोष मला देते.      

Thursday, 12 May 2011

का बोलत नाही माझ्याशी


तिच्याबरोबर बोलाव अस सारख वाटायला लागल. कामात लक्ष्य लागत नव्हत. काय कराव तेच कळत नव्हत. कधी एकदा तिच्याबरोबर बोलतोय अस झाल होत. अखेर मी ठरवल की २ मिनिट तरी तिच्याशी बोलाव पण ती फ़ोन केल्यावर बोलेल का माझ्याशी, हा प्रश्न मला सतावत होता. तिच्या ऑफिसमध्ये फ़ोन केला तर कदाचित १ मिनिट औपचारिकतासाठी तरी बोलेल. ऑफिसमध्ये फ़ोन केल्यावर २ मिनिट बोलली माझ्याशी कामात आहे. संध्याकाळी फ़ोन करेन अस म्हणाली. मी समजून गेलो हिला माझाबरोबर बोलायच नाही कारण जेव्हा जेव्हा संध्याकाळी फ़ोन करते  अस म्हणाली त्या प्रत्येक वेळी तिने मला फसवल होत. मी आपला मुर्खासारखा तिच्या फोनची वाट बघायचो. नंतर विचारल फ़ोन का केलास नाही तर न पटणार उत्तर  देऊन मोकळी व्हायची. मला १०१ % खात्री होती की आज संध्याकाळी सुद्धा ही फ़ोन करणार नाही, ऐवढ माहितअसून सुद्धा मी वेड़ा आशेवर तिच्या फोनची वाट बघत होतो. माझ सगळ लक्ष्य मोबाइलवर होत, न जानो ती कॉल करेल  आणि मी कामात असेनअखेर निराशाच पदरात पडली. नेहमीप्रमाने संदेश पाठवून विचारल, " संध्याकाळी कॉल का केलास नाहीस?". ती म्हणाली," सध्या मी तणावात आहे थोडा वेळ हवाय मला." मी म्हंटल ठीक आहे. ऑफिसमध्ये ज्या पद्धतीने ती माझ्याशी बोलली त्यावरून  तिला कसलाच तणाव नाही अस वाटत होत. कोणत्या गोष्टीचा तणाव आहे हे सुद्धा मला सांगत नव्हती. या गोष्टीने मला जास्तच तणाव वाटायला लागला. माझ्यावर मनापासून प्रेम करतेस तर ही गोष्ट का तुला मला सांगाविशी वाटत नाही. तुझ्या या अशा वागनानी तू मला दूर लोटतेस अस मला वाटतय.   

Wednesday, 11 May 2011

बोलणार की नाही


कालचा माझा अंदाज खरा ठरला, तू स्वत:हून मला फोन/ संदेश केला नाहीस. तुझ्या मनात काय आहे हे थोड्या प्रमाणात तरी मला सुधा कळत. संध्याकाळी निदान एक तरी संदेश पाठवून माझी चोकशी करशील अस मला वाटत होत पण तू मला निराश केलस. न राहवून अखेर रात्री मी तुला संदेश पाठविला, पण त्याच उत्तर ऐकून मी हबकूनच गेलो कारण तू म्हणालीस तशीच "काय बोलू". यावरून तुला माझाशी बोलायचं नाही हे स्पष्ट होत. गेल्या बुधवारपासून आपण बोललो नाही तरीही तू बोलतच नाहीस, मी काय कराव तेच कळत नाही मला. गेल्या मंगळवारी दिवसात आपल बोलण होणार नाही म्हणून तू खास पहाटे ५ वाजता उठून माझ्याबरोबर जवळजवळ २० मिनटे बोललीस, त्यानंतर ४ दिवस गावी काय गेलो आणि गावावरून आलो तर तू बोलणच बंद केलस, अस काय झाल या ४ दिवसात तू सांगणार तरच मला कळणार ना. तुला सतत फोनसंदेश करून नाईलाझाने माझ्याशी बोलण्यास भाग पाडणे मला योग्य वाटत नाही, तू माझाशी मनापासून फक्त २ शब्द बोललीस तरी सुधा मला समाधान लाभेल

Tuesday, 10 May 2011

कशी आहेस तू


मला घरी येयाला उशीर होणार होता हे तुला सांगितले तरी पण मी कुढ़े आहे, काय करतोय, जेवला आहेस की नाही याची साधी चोकशी सुधा कराविशी वाटली नाही. यावरुनाच तुला माझ्याबद्दल किती कलकल आहे हे कलते. रात्रि तू बोललीस पण मनापासून बोलत नवतिस अस वाटत होत की कुणीतरी जबरदस्तीने माझ्याबरोबर तुला बोलायला सांगितल. मी सहज तुला विचारल, " कशी आहेस" तर म्हणतेस "मी मजेत आहे " चार दिवसाचा माझ्या विरहाने सुधा तू मजेत राहु शकतेस, याचा अर्थ काय होतो( तो तुलाच माहिती). आज सकाळी सुधा मला खात्री होती की मी फ़ोन केल्यावर माझ्याशी तू बोलणार नाहीस. अस झाल की तुला बर वाटत हे मला माहित आहे आणि तुला बर वाटत म्हणून मी हे सारे सहन करतोय. आज रात्रि सुधा तू माझ्याशी बोलणार नाहीस हे मला माहित असून मी तुला फ़ोन/ संदेश करेन. माझा अंदाज खरा ठरला की नाही हे तुला उदया सागेनच

Monday, 9 May 2011

विरहाने बैचेन होशील का


मला वाटत होत, की तू माझ्या विरहाने बैचेन होउन मला सारखी फ़ोन/ संदेश करशील पण तुझ्या सादा एकही फ़ोन/ संदेश आला नाही. अजूनही तुला मला फ़ोन कारावास वाटत नाही. मी फ़ोन करूनही तू त्याला प्रतिउत्तर देत नाहीस. तू स्वत:हुन मला फ़ोन का करत नाहीस. रात्रिसुधा तुला वाटल नाही की मला फ़ोन/ संदेश करावा माझी चोकशी करावी माझा प्रवासाबद्दल विचारव. मी बघत होतो की तुला माझी आठवन येते की नाही म्हणून मी तुला रात्रि फ़ोन/ संदेश केला नाही. मला वाटलच होत की तू सकाळी फ़ोन केल्यावर उत्तर देणार नाहीस झाल पण त्याप्रमाणे