आई सकाळी देवळात जाताना ती आईला भेटली. आई म्हणत होती, या पोशाखत ती खुपच सुंदर दिसते. मला प्रश्न पडला की ती ऑफिसला आज लवकर का गेली, काय कारण असेल. याच विचारत मी होतो. माझ्या मते, एकतर ती मुलाखातिसाठी किवा ग्रुप बरोबर सहलीला गेली असेल. नेहमीप्रमाने मी तिला सकाळी कॉल केला. तिचा काही प्रतिसाद आला नाही. अंदाजे १० वेळा तरी तिला कॉल केला असेन तेव्हा तिने संदेश पाठविला, मी मुलाखातिसाठी बाहेर आहे. लगेच तिला शुभेच्छा देणार संदेश पाठविला व म्हंटल तुला वेळ मिळेल तेव्हा कॉल कर. मुलाखतीच्या ठीकणापासून तिच्या ऑफिसमध्ये पोहचण्यासाठी अंदाजे १ तास वेळ लागतो. या वेळेत ती मला कॉल करू शकली असती पण तिने कॉल केला नाही. मी आपला दर १ - २ तासनी तिला कॉल करत होतो. ती काही प्रतिसाद देत नव्हती. तरीही कॉल करत होतो. अखेर कामावरून घरी येताना तिने मला कॉल केला आणि विचारते सकाळपासून कॉल का करत होता. वरून मला सांगते मित्र आहे बरोबर आपण उदया बोलू. मी म्हंटल ठीक आहे. तिला पहाण्यासाठी रस्तात तिची वाट पाहत होतो अखेर ती दिसली, आज नेहमीपेक्षा खुपच सुंदर दिसत होती. अस वाटत होत की तिला पाहवतच रहाव. रात्री बोलण्यासाठी ३ संदेश पाठविले पण तिने काही प्रतिसाद दिलाच नाही.
No comments:
Post a Comment