रात्रीची पुरेशी झोप झाल्यामुले सकाळी उठल्यावर मन हलक हलक वाटत होत. त्यात आज सार्वजनिक सुट्टी असल्याने ऑफिस बंद होत. आजच्या दिवसात काय काय काम करणार याच्या आराखडा कालच तयार केला होता. बाकीची सर्व कामे राहिली तरी ते एक काम कसही फत्ते करायच होत. मोबाइलच्या कॉलला प्रतिसाद देणार नाही म्हणुन ११ वाजता ऑफिसमध्ये फ़ोन केला. ती म्हणाली,"मोबाइल वर कॉल कर." मोबाइल वर कॉल केल्यावर म्हणते दुपारी १ वाजता कॉल कर. जर तुला दुपारी १ वाजता कॉल करायला सांगायच होत तर फ़ोन वरच सांगायच. मग मोबाइल वर कॉल करायला का सांगितलस. यावरून कळत की, ती मला मानसिक त्रास देण्याची एकही संधि सोडत नाही. दुपारी कॉल केल्यावर सुद्धा असाच त्रास देणार याची मला चांगलीच कल्पना होती. झालही तसच. १ वाजल्यापासून कॉल करत होतो. अखेर ०१३० वाजता कॉलला प्रतिसाद दिला. दुपारी ०२३० वाजता करेन अस म्हणाली. तिचा राग शांत करायचा होता म्हणून सारखा कॉल करत होतो. अखेर ५ वाजता आमच बोलण झाल. ती कामात असल्याने आमच बोलण पाहिजे तस झाल नाही पण ताणलेले संबध पूर्ववत होतील इतक तर नक्की झाल. कामावरून घरी येताना हिने नेहमीप्रमाने कॉल काही केला नाही. संदेशद्वारे संध्याकाळी व रात्री आमच बोलण झाल. दिवसभरातील तिच्या बोलण्यावरुण माझ्या एक गोष्ट लक्ष्यात येत होती की, मे महिन्यापासून ही माझ्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करीत होती व ती तिच्या कामातल्या मित्राबरोबर जवलिक करीत आहे. ही गोष्ट अत्तापासून सुरु झाली की पहिल्यापासून आहे पण मला कलुन देत नव्हती हे पाहणे मला गरजेचे आहे. माझ्याबरोबर खरच प्रेम करते की घरी आल्यावर टाइमपास हवाय म्हणून माझ्याशी प्रेमाच नाटक करते हे थोड्या दिवसात कलेल मला. जास्त वेळ घेणार नाही यासाठी. लवकरच निकाल लावतो.
No comments:
Post a Comment