सकाळी झोपून उठल्यावर बर वाटत होत. पोटात दू:खाण्याचा त्रास कमी होता, पूर्ण बरा झाला नव्हता. ऑफिसला सुट्टी असल्याने घरीच आराम करणार होतो. घरचे गावी गेल्याने घरी एकटाच होता. ही स्व:ताहून मला कॉल करेल अशी आशा सोडून दिली होती. पण अशा या एकटेपणात तिची उणीव जरा जास्तच भासू लागली. वेळ जाता जात नव्हता व त्यात पोटात दु:खाण्याचा त्रास वाढू लागला होता. डोक्यात नको नको ते विचार काहुर माजावत होते. तिच्यावर असलेल्या विश्वासावर अशा वागणाने तडे पडायला सुरुवात झाली होती. खरच तिच माझ्यावरच प्रेम कमी झाल असेल. असेल सुद्धा. नाहीतर गेल्या ८ दिवसात मी घरी एकटाच आहे हे माहित असून देखील मी रोज जेवतो कुढे? जेवतो की उपाशी राहतो? घरातील कामे याची साधी चोकशी सुद्धा ती करत नाही. तिला वाटत असेल मी जर याला विचारल आणि याने मलाच जेवण बनवायला सांगितल तर तसेच घरची कामे सुद्धा माझ्याकडून करून घेइल. तू हे न सांगताच करायला हव होत. मला अजूनही आठवत की हिच्या मित्रांचे आई बाबा गावी गेले आणि ते एकटे असतील तर ही त्यांच्या आवडीचे पदार्थ बनवून त्यांच्यासाठी घेउन जायाची. मी तिला याबद्दल कधीही काही बोललो नाही. खरच ही माझ्यावर मनापासून प्रेम करीत असती तर गेल्या ८ दिवसात रोज नाही पण निदान १ दिवस तरी माझ्या आवडीचे पदार्थ डब्ब्याला बनवून ऑफिसला जाण्यासाठी डब्बा दिला असता, आवडते पदार्थ नको पण चपाती-भाजी नक्कीच दिली असती. मला कोणते पदार्थ खायला आवडतात आणि कोणते नाही हे तिला चांगलच माहित आहे. मला खास तिला सांगायची गरज नव्हती. का तिने अस केल नसेल.? त्या ४ दिवसात तिच माझ्यावरच प्रेम कमी व्हाव. याला काही अर्थच नव्हता. पण तिच खरच माझ्यावर प्रेम आहे की नाही हे मला कळत नव्हत तिच्या अशा वागण्यामुले.
रात्रि तिचा अनपेक्षित संदेश आला त्यात विचारत होती, जेवलास का? आणि माझ्यावरचा राग शांत झाला का.? याला मी काहीच उत्तर दिल नाही. थोड्या वेळ्याने तिचा दुसरा संदेश आला, त्यात ती म्हणाली, " माझ्या अशा वागण्यानी तुला त्रास झाला, त्याबद्दल मला माफ कर, पण बोल माझ्याशी" पण मी तिला अगोदर पाठविलेला संदेशची आठवण करून देवून कळवळ की, अगोदर माझ्याशी कॉल करून बोल त्यानंतर मी तुला कॉल/ संदेश करेन." याला तिने काही उत्तर दिले नाही. उदया बघू कॉल करते का.?
No comments:
Post a Comment