रात्रीच्या झालेल्या संभाशणाच्या आठवणीत कधी सकाळ झाली ते मला कळच नव्हत. थोडया वेळाने तिच्याबरोबर प्रत्यक्ष बोलणार याचा वेगळाच आनंद मला झाला होता. त्या क्षणाची मी वाट बघत होतो. मी तिला मोबाइल वर कॉल केला तिने सांगितले मैत्रीण आहे थोडया वेळाने कॉल कर. थोडया वेळाने कॉल केल्यावर तिचा प्रतिसाद काहीच आला नाही. कॉल का घेत नव्हती, हेच कळत नव्हत. आज तिने अस नको करायला पाहिजे होत. तिला अत्ता ऑफिसमध्ये फ़ोन केलेला आवडत नाही. संध्याकाळी कॉल करणार नव्हती याची खात्री होती. ती कामावरून घरी आल्यावर आमच संदेशद्वारे बोलण झाल नाही पण रात्री ती माझ्याशी प्रत्यक्ष बोलली कारण झोपण्यासाठी मैत्रीणीकड़े गेली होती. तिला विचारल कॉल का केला नाहीस तर म्हणते कामातला मित्र होता बरोबर कस बोलणार. कामावरून येताना हिला घरी सोडतो आणि नंतर त्याच्या घरी जातो. सकाळी ही सुद्धा त्याच्याबरोबर पुरुष प्रवाशांच्या डब्ब्यातून जाते. हे एकून मी गारच झालो. गर्दीतून कोणत्या अवस्तेत जात असतील याची कल्पना न केलेली बरी. हे सर्व ती मला सहजतेने सांगत होती. मला खात्री होत होती की माझ्या बरोबर प्रेमाच नाटक करते याची. जवळ जवळ आम्ही १ तास बोललो. पण नंतर माझ तिच्या बोलण्याकड़े लक्ष्य नव्हत. अशा प्रकारे ती माझ्या विश्वासघात करते याची मला चांगलीच जाणीव होऊ लागली.
No comments:
Post a Comment