तिच्याबरोबर बोलण्यासाठी आज मी जास्तच बैचेन होतो. सकाळीच तिच्या मोबाइलवर कॉल केला. मोबाइलची घंटी वाजत होती. कॉल रीसिव्ह केला नाही. मला वाटल, पर्स मध्ये मोबाइल असल्याने तिच्या लक्ष्यात येत नसेल. १० - १० मिनिटाच्या अंतराने मी तिला ४ कॉल केले. पण एकदा सुद्धा तिने माझ्या कॉल रीसिव्ह केला नाही. बोलायच तर होतच, मग काय ऑफिस मध्ये फ़ोन केला. राणी साहेब म्हणाल्या, " कामात व्यस्त आहे थोड्या वेळाने फ़ोन करते." मी यावर काहीच बोललो नाही. फ़ोन ठेवून दिला. आता तिच्या फोनची वाट बघण्यशिवाय मला गतंतर नव्हते. कामात लक्ष्य लागत नसल्याने मी तिला संदेश पाठवून सांगितले की मला आज जास्त काम नाही. तुला वेळ मिळेल तेव्हा मला कॉल कर. मी तुच्या कॉलची वाट बघत आहे. संध्याकाळी झाली तरी हिचा कॉल आला नाही म्हणून परत ऑफिस मध्ये फ़ोन केला. ती म्हणाली घरी जाताना तुला नक्की कॉल करेन कालच्या सारख होणार नाही. पण तिने आज सुद्धा कालच्या सारखच केल. ती घरी लवकर आली म्हणजे तिला ऑफिसमध्ये कामाचा लोड नव्हता. ती जाणूनबुजुन माझ्याशी बोलत नाही. हे माझ्या लक्ष्यात येत होत. तिच्या हा बदलेला अवतार पाहून तिच्याशी कस वागाव हेच कळत नव्हत. माझा तिच्यावरचा संयम सुटत होता. रात्रि तिला संदेश पाठविला, त्यात म्हटल " सोमवारी रात्रि तू मजेत होतीस, काल लगेच तणावमध्ये आलीस, खर काय ते तुलाच माहिती? जोपर्यंत तू स्व:ताहुन मला कॉल करून प्रत्यक्ष्य बोलत नाहीस. तोपर्यंत मी तुला कॉल करणार नाही आणि तू दिलेल्या संदेशाला उत्तर सुद्धा देणार नाही, तुझ्या अश्या वागन्याच अर्थ काय होतो तो कलतोय मला." या संदेशाला काय उत्तर देते याची वाट बघत बसलो. रात्रि तिने उत्तर दिले ते असे " अरे वेडया, असा तणाव घेवु नकोस, गावी गेला होतास तेव्हा तुला आली का माझी आठवण." माझ्या लक्ष्यात आल की, मी गावी गेलो तेव्हा हीने एक सुद्धा कॉल केला नाही, जर केला असता तर तिच्या लक्ष्यात आल असत की माझा मोबाइल बंद होता ते. यावरून असच वाटत की, हिला ४ दिवसात माझी आठवण आलीच नाही. काय बोलायच हिला आता.? आणि दोष मला देते.
No comments:
Post a Comment