ती ऑफिसला जाताना मला कॉल करीत नाही, तर आज सुट्टीच्या दिवशी खास मला कॉल करण्यासाठी घराच्या बाहेर जाइल व मला कॉल करेल. असा विचार करने, म्हणजे वेडया माणसाला एखादी गोष्ट समजून सांगने. ती कॉल करणार नाही याची मला २०२% खात्री होती. सुट्टी असल्याने घरातील कामे सावकाश करीत होतो. सकाळी नाश्ता करावासा वाटतच नव्हता कारण तिने स्व:ता बनविलेला नाश्ता करण्याचा खूपच मोह मला झाला होता. काय करू पण शकत नव्हतो मी. ती स्वयपाक उत्तम बनवत असून तिच्या हाताला चव सुद्धा चांगली आहे. हे तिच गुपित अजूनपर्यंत तिला मी सांगीतल नव्हत, ही गोष्ट माझ्या तोंडून ऐकण्यासाठी तिने बराच प्रयत्न केला पण विषय बदलून मी तिला सांगितले नाही.तिने बनविलेला पदार्थ खाण्याचा योग २ वर्षा पूर्वी आला होता. तेव्हा तिची मोठी बहिन गरोदर होती.बहिन आपली रोज ऐक ऐक नविन पदार्थ बनवायला सांगायची, ही पण तिच्यासाठी मन लावून पदार्थ बनवायची. एके दिवशी हिने रगडा पेटिस बनवून माझ्या घरी दिला होता, माझ्या नशिबात फक्त १ तुकडा आला, त्याची चव अजूनही मी विसरलो नाही. मी स्व: ताहुन हिला कधीच फरमाइश केली नाही आणि करणार सुद्धा नाही. २ वर्षानंतर आज तो योग येत होता पण हिने प्रयत्नच केला नाही. खास माझ्यासाठी बनवत नाही तर बहिनीसाठी बनवते अस सांगून माझ्याकरीता बनवायच. त्यात आज कुणीही वाटेकरू नव्हता. माझ मन चांगलाच तृप्त झाल असत. पूर्वीसारखी हिला माझी कळकळ राहिली नाही, नाहीतर काहीना काही
बनवून मला नाश्ताला जरुर दिल असत. पण सध्या मला दु:खी कस ठेवता येइल हेच ती बघत असते. फेरफटका मारण्याच्या निमिताने तिच दर्शन घेवुन याव अस वाटत होत. पण नाही गेलो. गावावरून आल्यापासून ती चेहरा दाखवायला सुद्धा टाळते. हिला त्रास होइल म्हणून लवकरच काकां कड़े जेवायला गेलो तिथे बराच वेळ थांबलो आणि ०३३० वाजता घरी आलो. ही सुद्धा घरच्यांन बरोबर बाहेर जावून आली होती. संध्याकाळी मानलेल्या बहिणीला घेवुन बाहेर फिरून आली. आल्यानंतर परत तिच्या मामाच्या वाढदिवसाच्या पार्टीला गेली ती रात्रीच आली. मी पण आपला संध्याकाळी एकटाच फिरत होतो तिच्या आठवणीना बरोबर घेउन. आमचे ताणलेले संबध परत कसे हलकेफुलके होणार यांचाच विचार करीत होतो. आज सुद्धा आमच काहीच बोलण झाल नाही. दिवस फुकट गेल्यासारखा मला वाटत होता. दिवसभरात तिच्या चेहरा पाहता आला नाही, तिच्या चेहरावर माझ्यासाठी असणारे भाव मला पहायचे होते. पण आत्ता ते शक्य नाही. खुप उशीर झाला होता.
No comments:
Post a Comment