तिच्याबरोबर बोलाव अस सारख वाटायला लागल. कामात लक्ष्य लागत नव्हत. काय कराव तेच कळत नव्हत. कधी एकदा तिच्याबरोबर बोलतोय अस झाल होत. अखेर मी ठरवल की २ मिनिट तरी तिच्याशी बोलाव पण ती फ़ोन केल्यावर बोलेल का माझ्याशी, हा प्रश्न मला सतावत होता. तिच्या ऑफिसमध्ये फ़ोन केला तर कदाचित १ मिनिट औपचारिकतासाठी तरी बोलेल. ऑफिसमध्ये फ़ोन केल्यावर २ मिनिट बोलली माझ्याशी कामात आहे. संध्याकाळी फ़ोन करेन अस म्हणाली. मी समजून गेलो हिला माझाबरोबर बोलायच नाही कारण जेव्हा जेव्हा संध्याकाळी फ़ोन करते अस म्हणाली त्या प्रत्येक वेळी तिने मला फसवल होत. मी आपला मुर्खासारखा तिच्या फोनची वाट बघायचो. नंतर विचारल फ़ोन का केलास नाही तर न पटणार उत्तर देऊन मोकळी व्हायची. मला १०१ % खात्री होती की आज संध्याकाळी सुद्धा ही फ़ोन करणार नाही, ऐवढ माहितअसून सुद्धा मी वेड़ा आशेवर तिच्या फोनची वाट बघत होतो. माझ सगळ लक्ष्य मोबाइलवर होत, न जानो ती कॉल करेल आणि मी कामात असेन. अखेर निराशाच पदरात पडली. नेहमीप्रमाने संदेश पाठवून विचारल, " संध्याकाळी कॉल का केलास नाहीस?". ती म्हणाली," सध्या मी तणावात आहे थोडा वेळ हवाय मला." मी म्हंटल ठीक आहे. ऑफिसमध्ये ज्या पद्धतीने ती माझ्याशी बोलली त्यावरून तिला कसलाच तणाव नाही अस वाटत होत. कोणत्या गोष्टीचा तणाव आहे हे सुद्धा मला सांगत नव्हती. या गोष्टीने मला जास्तच तणाव वाटायला लागला. माझ्यावर मनापासून प्रेम करतेस तर ही गोष्ट का तुला मला सांगाविशी वाटत नाही. तुझ्या या अशा वागनानी तू मला दूर लोटतेस अस मला वाटतय.
No comments:
Post a Comment