मी ४ दिवसासाठी गावी गेलो या कारणामुले तिला राग येवून ती माझ्याशी बोलत नाही, हे काही मला पटत नव्हते. खर कारण ती माझ्यापासून लपवत आहे. ते तिने का लपवाव, काय कारण असेल. गावी जाण्याचा आदल्या दिवशी सुद्धा तिच्या असाच मुर्ख वागनाने रागावलो होतो. किती दिवस गावी जाणार हेच तिला सांगितले नव्हते. पण मी तिच्यावर रागवालो होतो, ती नव्हती. या ४ दिवसात अस काय झाल हे मला समजन्याचा मार्ग सापडतच नव्हता. काल रात्रीच्या संदेशानुसार, सकाळी मी तिला कॉल केला नाही. तिने कॉल करायल पाहिजे होता पण तिने कॉल केला नाही. आज तिच्या ऑफिसमध्ये सुद्धा फ़ोन केला नाही. दिवसभर तिचाच विचार करत होतो. या गोष्टीचा मला जरा जास्तच त्रास होत होता. ऑफिसमध्ये कामात चुका होण्यापेक्षा आपल घरी जाव. साहेबाना सांगितल तब्येत बरी नाही, घरी जातो. दुपारी २ वाजता ऑफिसमधून घरी येण्यासाठी निघालो. काहीही सुचत नव्हत. योगायोगाने तिची आई भेटली रस्तात व म्हणाली," आज लवकर आलास कामावरून, मी म्हटल आज काम लवकर संपल म्हणून, खर कारण तुमची मुलगी आहे हे कस सांगणार ." मी आपला चातक पक्ष्याप्रमाने तिच्या कॉल ची वाट बघत होतो. पण दिवसभरात तिने कॉल केलाच नाही. संध्याकाळी तिची मानलेली बहिण दोन मुलंसह लांबून घरी राहायला आली. जी धूसर आशा होती ती पण संपली. रात्री एक तरी संदेश पाठविल अस वाटल होत पण नाहीच पाठवला तिने. संध्याकाळी खरोखरच अचानक माझ्या पोटात दुखू लागल. डॉक्टरकड़े जाणार नव्हतो पण त्रास जास्तच होत होता. अखेर १० वाजता डॉक्टरकड़े गेलो. या त्रासापेक्ष्या तिने दिलेल्या मानसिक त्रास जास्तच होता. अशा वेळी ती माझ्याबरोबर असावी अस मला सारख वाटत होत. पण याची साधी चोकशी करावी अस सुद्धा तिला वाटत नव्हत. याचाच मला जास्त दुख वाटायला लागल.
No comments:
Post a Comment