ती काल म्हणाली होती, उदया सकाळी तुझ्याबरोबर बोलण्यासाठी मी प्रयत्न करीन. याच अर्थ असा होतो की बोलण्यासाठी मी हिच्यावर दबाव आणतोय. ती माझा बरोबर मुक्तपणे बोलावी अस मला वाटायच. नाइलजाने बोलण्यापेक्षा न बोललेली बरी. या पध्दतीने बोलणात काही अर्थ नव्हता. सकाळी ५ वेळा कॉल केल्यावर तिने प्रतिसाद दिला, मोजून फक्त २ मिनिट बोलली. नंतर तिचा मोबाइल बंद झाला तो ऑफिसमध्ये गेल्यावरच चालू झाला. याचा अर्थ मला समजला. तरीही मी तिला ऑफिसमध्ये मोबाइल वर कॉल केला पण फायदा झाला नाही. संध्याकाळी मोबाइल वर कॉल केला तर तिच्या मैत्रिणीनी रिसीव्ह केला व म्हणाली बाहेर गेली आहे नंतर कॉल करेल. माझ्या लक्ष्यात आल की हिनेच जानूनबुजून मैत्रिणीकड़े मोबाइल दिला असणार व सांगितले असेल की बाहेर गेली म्हणून सांगा. ही बाहेर गेली तर मोबाइल ऑफिसमध्ये कशाला ठेवेल. यावरून तिला हेच सांगायचे होते की. यापुढे ऑफिसमध्ये तू मोबाइल वर सुद्धा कॉल करायचा नाही. कामावरून येताना तिने कॉल केला नाही. या पुढे आमच पाहिल्यासारख बोलण होणार नाही याची कल्पना मला येत होती
No comments:
Post a Comment