Wednesday, 8 June 2011

थोडी ख़ुशी थोडा गम

कालच्या सारखी आजपण मैत्रिणीच कारण देवून बोलणार नाही अस मला वाटत होत. फक्त कॉल करायचा म्हणून मी आपला तिला नेहमीच्या वेळेला कॉल केला. ९ व्या कॉल तिने रिसीव्ह केला. आता फक्त औपचारितेसाठी बोलेल अस वाटत होत पण या वेळेला माझा अंदाज तिने खोटा ठरविला. ती जवळ जवळ २० मिनिट माझ्याशी बोलली. माझ्यासाठी तिने खास वेळ काढला होता. हा वेळ तिच्या ऑफिस टाइम होता तरी सुद्धा ती  बोलली. परत आजसुद्धा आठवण करून दिली की यापुढे आपल बोलण फक्त सर्वसाधारण असेल. पण मनसोक्त बोलत होती. तिच्या बोलण्यावरून अजूनही तिच पूर्वी सारख प्रेम आहे हे जाणवत होत पण ती ते दाखवून देत नव्हती. बराच दिवसाणी तिच्या असा बोलणानी मला बर वाटल होत  संध्याकाळी तुला कॉल करते अस स्व:ताहून सांगीतल. कॉल करणार नाही याची मला खात्री होती पण कदाचित करेल या आशेवर मी होतो. तिचा कॉल घरी असताना आला तर बोलायला जमणार नाही म्हणून मी उशिरा आलो स्टेशनला तर ही बसच्या लाइन मध्ये उभी होती, मी म्हंटल आपण बरोबर जाऊ तर ती म्हणाली तू जा मी मागुन येइन. मला बघितल्यावर तिच्या चेहरा पडला होता म्हणून मी तिच ऐकल. सकाळी बोलल्यावर जो आनंद झाला होता तो संध्याकालच्या वागणानी पूर्ण विरघलूनच गेला. उदया सकाळी बोलणार नाही हे आताच मला कळल होत.  

Tuesday, 7 June 2011

काहीही बोल पण बोल

घरी असताना संदेश पाठवू नकोस अस सांगितल्यामुले आज सकाळी संदेश पाठविला नाही. कामावर लवकर गेली, म्हणजे आमच सकाळी बोलण होणार नाही हे मी समजून गेलो. तरीही नेहमीच्या वेळेला मी कॉल केला तिच्या लगेच संदेश आला, " मैत्रिण बरोबर आहे " मी म्हंटल ती नसताना १ मिनिट तरी बोल अस उत्तर दिल. ४ कॉल केलेच पण काही उपयोग झाला नाही. थोड्या वेळाने संदेश पाठविला त्यात म्हणालो, " का नाही रागवलिस माझ्यावर ? रागव, काहीही बोल, बडबड मला, पण अशी गप नको राहूस. पूर्वी बोलायचिस तसीच बोल, घरी असताना सुद्धा संदेशद्वारे बोल. अस केलस तरच मी समजेन तू मला मनापासून माफ केलस म्हणून, तुझ्या प्रतिसादची वाट बघतोय." सकाळपासून संदेश पाठविले. अखेर संध्याकाळी तिने उत्तर दिल. पण माफ केलय अस नमूद केल नव्हत. खर तर तिने मला अपेक्षित असलेल उत्तर दिलच नाही. मी पण आग्रह धरला नाही. आज संध्याकाळी लवकर घरी आली होती. बोलताना जरी ती मला माफ करीत असली तरी घरी गेल्यावर वागताना तिची नाराजी लगेचच जानूण येते. कदाचित उदया सुद्धा मला अशीच तिचा आवाज ऐकू देणार नाही वाटत.    

Monday, 6 June 2011

शुभ प्रभात



शनिवारी सकाळी " शुभ प्रभात " असा कालच्या सारखा संदेश पाठविला पण आज तिने प्रतिसाद दिला नाही. तिच्या अशा वागण्यानी, तिच्या मनात काय चालय हेच कळूच देत नाही. मला वाटल आज आमच बोलण होणार नाही. आता परत मी पहिल्या सारखा कॉल करत राहतो जेणेकरून तिचे दोन शब्द तरी ऐकायला मिळतील. तिला माहिती आहे की मला तिचा गोड आवाज खूप आवडतो ते. म्हणून तर थोडा वेळ वाट बघायला लावून नंतर बोलणार. ८ व्या कॉलला बोलली, तिची मैत्रिण होती बरोबर म्हणून अगोदर नाही बोलली. आपेक्षा नसताना बोलली खूप बर वाटल. आज सुद्धा ४ संदेश पाठविले. नेहमीसारखी रात्री संदेशद्वारे बोलावी म्हणुन संदेश पाठविला पण तिने प्रतिसाद दिला नाही. रात्री ती तिच्या बाबाना खूप ओरडत होती, मला वाटत होत की माझा राग त्यांच्यावर का काढते. त्या विचारानी रात्रभर झोपलो नाही. रविवारी सकाळी तिला संदेश पाठविला त्यात म्हणालो, " तुला रागात मेल पाठवून माझाकडून मोठी चुक झाली आहे, तू खुपच दुखावली आहेस, यापुढे नाही होणार अशी चुक, मनापासून माफ कर आणि पूर्वीसारखी वाग माझ्याशी, हे मला संदेशने कळव, मी वाट बघतोय." ३ संदेश पाठविल्यावर तिने प्रतिसाद दिला, " अरे मी तुझ्यावर रागवले नाही, तू संदेश पाठवू नकोस" यावरून ती नाराज आहे हेच स्पस्ट होते. मला पाहण्यासाठी आज ती माझ्या घरी आलीच नाही. संध्याकाळी मैत्रिणी बरोबर फिरायला गेली होती पण मी आपला तिच्या विचारातच होतो. हिला त्याच  काहीही वाटत नव्हत.   

Saturday, 4 June 2011

दुरावा वाढतोय

       
तिला वाटल की हा आजपण माझ्याबरोबर स्टेशनला येइल म्हणून लवकर निघाली. मी नेहमीप्रमाणेच कामावर निघालो. सकाळी " शुभ प्रभात "  असा संदेश पाठविला. तिने सुद्धा लगेचच प्रतिसाद दिला. कॉल केल्यावर बोलली माझ्याशी बराच वेळ. बोलण्यातून दुरावा जाणवत होता. तुझी आठवण आली तर संदेश पाठवू का ? ती म्हणाली, " चालेल मला तू पाठव." प्रेमाच बोलण्यापेक्षा सर्वसाधारण गोष्टीवर बोलण्याचा तिचा जास्त कल होता. आमचे बिघडलेले संबंध परत पूर्ववत होतील अशी काही चिन्ह दिसत नव्हती. भेटण्यापेक्षा मला ती पूर्वी सारखी माझ्याशी बोलावी असच वाटत होत. ती खुपच हट्टी तसेच जिद्दी आहे त्यामुले ती नाही माझ ऐकणार. प्रत्यक्ष बोलण्यापेक्षा आमच संदेशद्वारे बरच बोलण होयच, त्याला वेळेच बंधन नसायच. त्याला आता मी पूर्णपणे मुकणार. संध्याकाळी ती कामावरून घरी आल्यावर मी खास तिला बघण्यासाठी तिच्या घरी गेलो. घरातच होती. मला बघितल्या नंतर सुद्धा तिच्या चेहरावर हसू होत, ते बघून मला खुप बर वाटल. सकाळी बोलताना सागितल होत की हसरा चेहरा ठेव. माझ ऐकल तिने. यावरून ती माझ्यावर मनापासून प्रेम करते हेच सिद्ध होत. सकाळपासून दिवसभरात ५ संदेश पाठवले. खुप दिवसानी तिला मी असे संदेश पाठवले. आता रोजच पाठवेण. 

Friday, 3 June 2011

गोड हसून बोलणार ना

            
काल रात्रीच तिला सागुन ठेवल होत, उदया आपण दोघे एकत्र रेल्वे स्टेशन पर्यंत जाऊ. देलेल्या वेळेला ती बस स्टॉपला आली. मला अपेक्षा होती ती माझ्याबरोबर ऐइल म्हणून. तिच्या चेहरावर वेगलाच तणाव होता. उदास चेहरा पाहून मला माझ्या अपराधाची जाणीव झाली. तिच्या मते तो अपराध होता, पण जे खर आहे तेच तिला वेगळ्या बाजूनी दाखवून मी दिल होत. सत्य हे पचवन फार कठीण असत पत्येकला जमत नाही ते.त्यामुलेच ते तिच्या मनाला  चांगलाच लागल. बसमध्ये सीट वर बसताना ती माझ्या बाजूला न बसता वेगळी बसली, यावरून राणीसाहेबाचा मुड़ मला लगेच कळला, त्यामुले बसमध्ये आमच बोलण झालच नाही. बस मधून उतरल्यावर स्टेशनला जाई पर्यंत बोललो. रेल्वेच्या डब्ब्यात चढल्यावर कॉल कर त्याप्रमाणे मी कॉल केला, १५ - २० मिनिट ती माझ्याबरोबर बोलली. रात्री ११ नंतर मला संदेश पाठवू नकोस, यापुढे आपण भेटणार नाही फक्त फ़ोन वरून बोलायाच. तुला मी विसरण्याचा प्रयत्न करते मला मदत कर. अस ऐकून मी गार झालो. ती हे सर्व शांतपणे सांगत होती, मी तुझ्यावर नाराज आहे हे तिच्या बोलणातून मला कलू नहे याचा ती प्रयत्न करीत होती. दिवसभर मी तिचाच विचार करत होतो. कामावरून घरी आल्यावर संदेशद्वारे माझाशी बोलेल अशी मला आशा होती, ती संदेश पाठवित होती पण मला नाही इतराना.  घरात  हल्ली ती खुपच शांत असते असे तिचे घरचेच म्हणतात. याला अप्रत्यक्ष मी सुद्धा जबाबदार आहे हे तिला आणि मलाच माहिती.    

Thursday, 2 June 2011

माझ्याकडून दुखावली गेली

         
मी पाठविलेला मेल वाचून ती खुपच नाराज झाली आहे. त्यामुले आता ती माझ्या  पासून दूर जाण्याचा प्रयत्न करीत आहे. अस सांगुन मला तिला माझ्यापासून दूर करायच नव्हत. मला फक्त माझ मन तिच्याजवळ मोकळ करायच होत. ती मला वेळ देत नव्हती म्हणून रागाच्या भरात मी काही बोलू  शकत नव्हतो आणि तो राग मी मेल पाठवून व्यक्त केला. पण त्याचा असा परिणाम होइल याची मला कल्पनाच नव्हती. तिला कस मनवु हेच मला कळत नव्हत. तिला माझ्यासाठी राजी करायच आहे. काल तिच्याशी बोलाव अस वाटल म्हणून ऑफिसमध्ये फ़ोन केला, म्हणाली साहेबानी बोलावल, खुपच तणावात आहे, संध्याकाळी कॉल करुन बोलेन. तिच्या बोलणावरुनच मला कळत होत. दिवसभरात सारखी तिची आठवण येत होती. सर्व बाजूनी तिला त्रास असताना मी तिला समजुन घेण्या ऐवजी हा मेल पाठवून तिला चांगलाच दुखावल. संध्याकाळी  तिला बोलणासाठी संदेश पाठविला. पाठविलेला संदेश पोहचला की नाही हे पाहण्यासाठी कॉल केला तिने कॉल रिसीव्ह केला अंदाजे ३ मिनिट बोलली. थोडया वेळाने कॉल करते. परत मीच संदेश पाठवून नको करूस अस सांगीतल. तिचा बोलण्यावरून ती दुखावले याची मला जाणीव झाली. माझ्याकडून दुखावली गेली आहे हे मी सहन नाही करू शकत. ही चुक मला लवकरच दुरुस्त करावी लागणार. त्यासाठी  रात्री २ संदेश पाठविले त्याला काहीच प्रतिसाद दिला नाही.